Welcome to our website
ध्येय व उद्दिष्टे : प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांच्या समग्र साहित्याचे संकलन करून ते प्रकाशित करणे हे मुख्य ध्येय ठेवून मावळाई प्रकाशन संस्था सुरू करण्यात आली आहे.
उपक्रम : शैक्षणिक संस्था व विद्यापीठस्तरावर (पदवी, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, अध्यापक व व्यावसायिकांसाठी) शरद् पाटील यांचा विचार व त्यांच्या साहित्यसंपदेचा चिकित्सक अभ्यास व्हावा यासाठी वर्षभरात चर्चासत्र - परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा व प्रबोधन शिबिराचे आयोजन करणे.
शरद् पाटलांचे जीवन - कार्य व त्यांचा ज्ञानव्यवहार तसेच त्यांच्या ग्रंथसंपदेवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी कार्यशाळा घेणे, मार्गदर्शन वर्ग चालविणे. तसेच त्यांचे समग्र साहित्य भारतीय व वैश्विक भाषेत भाषांतर व प्रकाशन करणे.
शरद् पाटील यांच्या स्मृती जतन करण्याच्या हेतूने त्यांच्या नावे वस्तुसंग्रहालय, संदर्भग्रंथालय व सभागृहयुक्त असे एक सांस्कृतिक केंद्र उभारणे. त्यांचे जीवनपट व कार्य यावर आधारित माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार करणे.
त्यांचे अप्रकाशित साहित्य संकलित व प्रकाशित करणे.